अमृतसर : एकीकडे देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनली आहे. जगाच्या पाठीवरील बहुसंख्य देश आज कोरोनाच्या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन मानवतेचे दर्शन घडवत आहेत. मात्र कोरोनाच्या या भीषण संकटातही काही समाजकंटक उन्माद घालताना दिसत आहे. याचेच एका ताजे उदाहरण पंजाबमधील एका गावामध्ये उघडकीस आले असून दारू विक्रीस मनाई केल्याच्या किरकोळ कारणावरून दारू दुकानात काम करणाऱ्या मजुरास जबर मारहाण करत त्याला जीवे मारण्याची अमानवीय घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लॉक डाऊनमुळे सर्वच प्रकारच्या दुकानांना व्यापार करण्यासाठी वेळ ठरवून देण्यात आली आहे. सरकारी नियमांप्रमाणे दारू दुकानदार देखील नियोजित वेळेतच दारू विक्री करतायेत. अशातच आज पंजाब येथील खन्ना येथे दारू विक्रीची वेळ संपल्यानंतर काही लोक दारू खरेदीसाठी दारू दुकानात दाखल झाले. मात्र येथे काम करणाऱ्या कामगाराने वेळ संपली असल्याने दारू विक्रीस मनाई केली. याचाच राग धरत या टोळक्याने सदर कामगारास बेदम मारहाण करत त्याच्या जीव घेतला.
घडलेल्या प्रकाराबाबत दुकानांमध्ये काम करणाऱ्या एका अन्य कर्मचाऱ्याने माहिती दिली असून पोलीस सदर इसमांचा शोध घेत आहेत.
#Punjab: Employee at liquor shop in Khanna dies after being beaten by a group of men after he allegedly denied to sell alcohol to them. Another man (in pic) working at shop says the group came after closing time. Police probe underway. pic.twitter.com/QEc0k7Qmm8
— ANI (@ANI) May 28, 2020