नवी दिल्ली – केंद्र सरकारने सलग तिसऱ्या तिमाहीमध्ये अल्पबचतीवरील व्याजदरात कसलाही बदल केलेला नाही. 1 आक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या तिमाहीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर 7.1 टक्के व्याजदर मिळणार आहे.
तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 टक्के व्याजदर मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली असून उत्तर प्रदेशात लवकरच होणाऱ्या निवडणुकांमुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
उत्तर प्रदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात अल्पबचत योजनांचा लाभ घेतात. या अगोदरच्या तिमाहीत सरकारने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर हा निर्णय रद्द करण्यात आला होता.