नगर -दिवाळीत अनेकांनी बंधने झुगारल्याने करोनाबाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आज स्पष्ट होत आहे. तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असून, आज तब्बल 324 नव्या करोनाबाधितांची रुग्णसंख्येत भर पडली. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आज तब्बल साठ हजारांचा टप्पाही पार केल्याने पुन्हा एकदा भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.
जिल्ह्यात आज 266 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 57 हजार 964 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.49 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 324 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1207 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 27, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 101 आणि अँटिजेन चाचणीत 196 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 16, कर्जत 01, नगर ग्रामीण 02, पाथर्डी 01, राहुरी 01, श्रीगोंदा 04, कॅन्टोन्मेंट 01 आणि इतर जिल्हा 01, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 36, अकोले 05, जामखेड 02, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 29, नेवासे 01, पारनेर 03, पाथर्डी 14, राहाता 05, राहुरी 15, संगमनेर 02, श्रीगोंदा 03, कॅन्टोन्मेंट 01 आणि इतर जिल्हा 01, अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटिजेन चाचणीत आज 196 जण बाधित आढळून आले. यामध्ये, अकोले 25, जामखेड 02, कर्जत 06, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 15, नेवासे 11, पारनेर 11, पाथर्डी 22, राहाता 23, राहुरी 08, संगमनेर 37, शेवगाव 14, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 16, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 45, अकोले 29, जामखेड 05, कर्जत 04, कोपरगाव 02, नगर ग्रा.18, नेवासे 15, पारनेर 15, पाथर्डी 32, राहाता 11, राहुरी 44, संगमनेर 28, शेवगाव 11, श्रीगोंदा 06 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.