60 year old woman body transformation | सध्या सोशल मीडियावर एका 60 वर्षीय महिलेची खूप चर्चा होत आहे. एलेनी ब्लॉक असे या महिलेचे नाव असून ती हवाईची रहिवासी आहे. या 63 वर्षीय महिलेची शरीरयष्टी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एलेनी ब्लॉक या व्यवसायाने वकील होत्या आणि आता अनेकांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.
वयाच्या 60 व्या वर्षी एलेनी यांना बॉडी बिल्डिंगची इतकी आवड निर्माण झाली की त्या भल्याभल्यांना मात देत आहेत. त्यांनी दोन वर्षात कठोर परिश्रम घेऊन स्वतःमध्ये असा परिवर्तन घडवून आणला की लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
वास्तविक एलेनी नोकरीमुळे त्यांच्या फिटनेससाठी वेळ देऊ शकत नव्हत्या. वयाच्या 60 व्या वर्षी वजन कमी करायला हवं असं त्यांना वाटत होतं. यासोबतच त्यांना प्रोफेशनल बॉडीबिल्डर्ससारखी बॉडी बनवायची होती. 2020 मध्ये, एलेनीने डायटिंग सुरू केले आणि जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. त्यांनी या वयात कठोर परिश्रम केले आणि इंस्टाग्रामवर त्यांच्या शरीरातील बदल लोकांना सांगण्यास सुरुवात केली.
एलेनी यांनी अडीच वर्षे सतत मेहनत करून आपले वजन तब्बल 30 किलोने कमी केले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आपली बॉडी प्रोफेशनल बॉडी बिल्डर्ससारखी बनवली, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
एलेनी यांना वयाच्या 60 व्या वर्षी जोआन मॅकडोनाल्डकडून जिममध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या 76 व्या वर्षीही जोआन मॅकडोनाल्ड जिममध्ये जातात.
एलेनी यांनी सांगितले की, वयाच्या 70 व्या वर्षी जोआनने बॉडी बिल्डिंग सुरू केली. यानंतर त्यांनी विचार केला की आपल्या 61 व्या वाढदिवसापूर्वी आपण देखील बॉडी बिल्डिंग का सुरू करू नये ? एलेनीने दोन बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. सध्या त्यांचे वय 63 वर्षे आहे.
एलेनी यांची शरीरसौष्ठव पाहून त्यांच्या मैत्रिणींनाही धक्का बसतो. त्यांच्या म्हणण्यानुसार एलेनीने तिचे वय 10 वर्षांनी मागे केले आहे. एलेनी यांचे म्हणणे आहे की, वयाच्या 20 व्या वर्षी त्यांचे जेवढे वजन होते तेच आताही आहे. इंस्टाग्रामवर 28 हजारांहून अधिक लोक एलेनीला फॉलो करतात.