508 जणांच्या मुसक्‍या आवळल्या

लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांची माहिती

लोणी काळभोर- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवायांचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत 508 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.

बंडगर म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दि. 25 जानेवारी ते 10 मार्च 2019 या कालावधीत एकूण 202 जणांविरोधात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. यातील 192 जणांविरोधात मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. तर 8 जणांविरोधात मुंबई पोलीस ऍक्‍ट नुसार कारवाई करण्यात आली आहे. मुंबई प्रोव्हिजन कायदा (हातभट्टी दारु विरोधी कायदा) अन्वये एका जणांविरोधात तर एमपीडीए (मुंबई झोपडपट्टी दादा प्रतिबंधक) कायदा अन्वये एका जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर 254 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 224 जणांविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम अन्वये तर मुंबई पोलीस ऍक्‍ट नुसार 7 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई प्रोव्हिजन कायदा (हातभट्टी दारु विरोधी कायदा) नुसार 22 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत एक महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्‍का) नुसार एक कारवाई करण्यात आली आहे.

दि. 25 जानेवारी ते 1 एप्रिल 2019 या कालावधीत मुंबई पोलीस कायदा कलम अन्वये एकूण 415 जणांविरोधात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबई पोलीस ऍक्‍टनुसार 15 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई प्रोव्हिजन कायदा (हातभट्टी दारु विरोधी कायदा) अन्वये 23 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए (मुंबई झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) व मोक्‍का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) या दोन्ही कलमांच्या प्रत्येक एक एक कारवाई करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. कुणीही आचारसंहिता भंगाची कृती केल्यास किंवा कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा बंडगर यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.