पुणे – करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश असून सुमारे 50 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात येणार आहे, अशा कर्मचाऱ्यांनी अर्ज केले असून 31 हजार 721 अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत.
पहिल्या टप्प्यात करोनाबाधितांवर उपचार करणारे सरकारी, खासगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आणि अधीक्षक, आरोग्य अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, सहायक आरोग्य कर्मचारी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना करोना प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे.
करोना प्रतिबंधक लस विकसित होत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीच्या वितरणाचे नियोजन सुरू केले आहे.
लसीकरणाच्या नियोजनासाठी नुकतीच क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून शहरातील खासगी रुग्णालये आणि जनरल प्रॅक्टिशनर यांना त्यांची माहिती पाठवण्यासाठी पत्रे दिली आहेत. ही माहिती केंद्राच्या लिंकवर अपलोड करण्यात येणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही माहिती राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
– डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका