मुंबई – बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित असलेल्या बायॉपिकमध्ये परिणीती झळकणार आहे.
My lookalike 😉😉 @ParineetiChopra 😍😍 #sainamovie 👍👍 https://t.co/BfSDMWayJs
— Saina Nehwal (@NSaina) November 5, 2020
या बायॉपिकमध्ये आपली भूमिका सक्षमपणे साकारण्यासाठी ती ट्रेनिंग घेत आहे. नुकतंच परिणीतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने भुमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. तिचा हा लुक डिट्टो सायना नेहवालच्या लुकशी मिळता जुळता आहे. खुद्द सायना नेहवालनेही हा फोटो तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
This is going to be huge 🔥#Saina 🏸@ParineetiChopra @NSaina pic.twitter.com/YIaF4znKyV
— Parineeti Chopra FC (@Parineeti___FC) November 5, 2020
दरम्यान, सायना नेहवालच्या या बायोपिकसाठी आधी अभिनेत्री श्रद्धा कपूरला घेण्यात आलं होतं. श्रद्धानं या सिनेमासाठी शुटींगही केलं होत पण तिने हे शुटींग अर्ध्यातच सोडून दिलं. त्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राला या भुमिकेसाठी घेण्यात आलं. परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास “भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि हॉलिवुडमधील “द गर्ल ऑन द ट्रेन’च्या हिंदी रीमेकमध्ये ती झळकणार आहे.