नगर -नगर शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी मनपाचे कर्मचारी प्रत्यक्षात करोनाचा प्रार्दभाव होऊ नये, यासाठी शहरात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. कर्मचऱ्यांचा करोना संसर्ग आजाराने जर दुर्देवी मृत्यू झाल्यास महानगरपालिका कर्मचारी पंतसंस्थेच्या वतीने 50 हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात येणार असल्याचे, पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी संस्था आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने सभासदांसाठी विविध निर्णय घेण्यात आली आहे. तसेच संस्थेतील सहा सभासदाचा दुर्देवी मयत झाल्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज निवारण निधीमधून सुमारे 4 लाख 53 हजार 238 रुपये माफ करण्यात आले.
तसेच सभासदांना 2019-20 सालासाठीचा 15 टक्के (लाभांश) वाटपाची तरतूद करण्यात आलेली आहे. याविषयीची सूचना संचालक सतीश ताठे यांनी मांडली. त्याला अनुमोदन जितेंद्र सारसर यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष विकास गिते, जितेंद्र सारसर, किशोर कानडे, सतीश ताठे, बाळासाहेब पवार, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब गंगेकर, प्रकाश आजबे, कैलास भोसले, अजय कांबळे, नंदा भिंगारदिवे, चंद्रकाल खलचे, आनंद तिवारी, राजू गंधे उपस्थित होते.