बारामती – राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 हजार रुपयांचा धनादेश प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मदत करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस विठ्ठलराव गोळे त्यांच्या प्रयत्नातून संघटनेचे सदस्य कामगार यांच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात आला.
टॉवेल इंजिनिअरिंग, औरंगाबाद इंडस्ट्रीज व बिल्ट ग्राफिक्स येथील कामगार तसेच तालुकाध्यक्ष संग्राम जगताप, विक्रम बलवंड, वल्लभ गावडे यांचे सहकार्य लाभले.