सातारा – सातारा जावळी मतदारसंघातील 17 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते व पूल परीक्षण आणि दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम योजनेतून मिळाल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
यामध्ये सातारा तालुक्यातील सातारा, गजवडी, चाळकेवाडी रस्ता (भाग गजवडी ते बोरणे ते राजापुरी फाटा) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 3 कोटी 20 लाख रुपये, शेंद्रे बाह्यवळण रस्ता (भाग सोनगाव कचरा डेपो ते बोगदा) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 1 कोटी 20 लाख, परळी, बनघर, कूस, खुर्द, कूस बु., खडगाव, ताकवली, निगुडमाळ, नित्रळ, कातवडी, केळवली, धनगरवाडी, धावली ते प्रमुख जिल्हा मार्ग 26 रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग (भाग वरची जळकेवाडी ते धावली) या रस्त्याची विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी 50 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग 29 ते पोगरवाडी आरे दरे रेवंडे वावदरे राजापुरी ते प्रमुख जिल्हा मार्ग (भाग राजापुरी ते प्रमुख जिल्हा मार्ग 29) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 3 कोटी, आसनगाव,
कुसवडे, निनाम, सोनापूर, गणेशखिंड ते कोंजावडे रस्ता (भाग आसनगाव ते धनवडेवाडी) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 1 कोटी 10 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग 29 ठोसेघर, चिखली, जांभे, बोपोशी, करंजोशी, आवर्डे ते प्रमुख जिल्हा मार्ग (भाग चाळकेवाडी ते जांभे) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी, मर्ढे ते राज्य महामार्ग 4 लिंब, बसाप्पाचीवाडी, आरळे, पाटखळ वाढे, म्हसवे, वर्ये, नेले, धावडशी, आकले ते राज्य मार्ग 140 रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग (भाग वर्ये किडगाव फाटा ते माळ्याची वाडी ते राज्य मार्ग 140) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 3 कोटी, राज्य मार्ग 140 ते कण्हेर, वेळे, कुसुंबी, मोहोट, म्हाते खु., वागदरे ते इतर जिल्हा मार्ग 31 मानेवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग (भाग कामथी ते मानेवाडी) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी 20 लाख, राज्य महामार्ग 4 ते म्हसवे, करंजे, मोळाचा ओढा, शाहूपुरी पोलीस ठाणे, शाहूपुरी चौक ते जुना मेढा रस्ता ते सारखळ प्रमुख जिल्हा मार्ग (भाग म्हसवे ते करंजे नाका) (भाग शाहूपुरी ते जिव्हाळा कॉलनी) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 3 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
सातारा कास बामणोली प्रमुख जिल्हा मार्ग (प्रमुख जिल्हा मार्ग 26 ते कासाणी), (भाग घाटाई देवी मंदिर ते वांजळवाडी) या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग 135 ते अंबवडे बु., करंजे, शिंदेवाडी, मस्करवाडी, लावंघर, अनावळे ते प्रमुख जिल्हा मार्ग (भाग करंजे ते लावंघर) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 1 कोटी 30 लाख निधी मिळाला आहे. जावळी तालुक्यातील भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी, खिंड, रेंडीमुरा, कुंभारगणी, मोरखिंड, जननीमाता मंदिर, मोरावळे ते राज्य मार्ग (भाग रेंडीमुरा फाटा ते कुंभारगणी) या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 3 कोटी, जोर, वाई, पाचवड मेढा रस्ता प्रजिमा 19 (भाग कुडाळ ते सावंतवाडी फाटा) आणि (भाग आलेवाडी घाट ते मेढा) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी 50 लाख,
प्रजिमा 26 ते कास, एकीव, गाळदेव, माचूतर (भाग गाळदेव ते खिलारमुरा) या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 4 कोटी 80 लाख, पाचगणी कुडाळ रस्ता प्रजिमा 25 कि.मी. 15/000 ते 22/800 (भाग सोमर्डी ते कुडाळ) रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 7 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महू, पिंपळी, खर्शी, वालुथ, हुमगाव, इंदवली, दरे, करंदोशी, (भाग प्रजिमा 25 ते महू) या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी 10 लाख आणि भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी, खिंड, रेंडीमुरा कुंभारगणी, मोरखिंड, जननीमाता मंदिर मोरावळे ते राज्य मार्ग 140 प्रजिमा (भाग तालुका हद्द ते मालदेव खिंड) या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.