नवी दिल्ली – केरळमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळून आले आहे. जिल्ह्यातील पूवारानी येथे हा खळबळजनक प्रकार घडला आहे. मृतांमध्ये कुटुंबातील सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.
जेसन थॉमस, त्याची पत्नी मेरीना, मुलगा जेराल्ड, मुलगी जेरीना आणि सात महिन्यांचे बाळ जेरील यांचा मृतांमध्ये समावेश आहे. जेसन आणि त्याचे कुटुंब येथे अनेक वर्षांपासून राहत होते व ते जवळच असलेल्या कंपनीत वाहन चालक होता.
मृतांपैकी अन्य चौघांच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत तर जेसन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यावरून त्याने अगोदर सगळ्यांची हत्या करून आत्महत्या केली असावी असा कयास वर्तवला जातो आहे.
मात्र त्याने हे टोकाचे पाउल का उचलले असावे हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस पुढील तपास करत असून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या नातलगांकडे सोपवले जाणार आहेत.