रफाह – अमेरिकने गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींच्या मदतीसाठी विमानातून टाकलेल्या मदत पॅकेजचे पॅराशूट न उघडल्यामुळे या मदतीच्या खोक्यांखाली सापडलेले ५ पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले. अमेरिकेच्या मदतीच्या विमानांनी घिरट्या घालायला सुरुवात केल्यावर ही अन्नाची पाकिटे मिळवण्यासाठी खाली मोठी गर्दी जमा झाली होती.
विमानातून अन्नाच्या पाकिटांची खोकी टाकण्यात आली. मात्र या खोक्यांना जोडलेली पॅरेशूट वेळेवर न उघडल्यामुळे ही खोकी थेट खाली जमा झालेल्या गर्दीवर पडली. यामध्ये लहान मुले, किशोरवयीन युवक आणि महिला देखील होत्या.
अंगावर ही अवजड खोकी एका घराच्या छतावर एखाद्या रॉकेटप्रमाणे पडली. त्यामुळे या घराचे छतच कोसळले. त्यामुळे घरात असलेल्या या ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, असे प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले.
इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून उत्तर गाझातील लोक वीज, पाणी, सांडपाणी इत्यादी मूलभूत सुविधांअभावी जगत आहेत. गाझाची स्थिती दुष्काळाच्या परिस्थितीपेक्षा कमी नाही.