मुंबई – मुंबई विमानतळावर तब्बल 5.68 कोटी रुपयांचे 568 ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तीन विदेशी महिलांना डीआरआयने अटक केली आहे. यामध्ये दोन युगांडा आणि एका टांझानियाच्या महिलेचा समावेश आहे.
सॅनिटरी पॅडमधून या अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत होती. दरम्यान पहिल्यांदाच अशा प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी आल्याचे सांगितले जात आहे.
परंतु अत्यंत सावधपणे आणि योग्य नियोजन करुन डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या तिन्ही महिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे. मुंबईत सध्या विविध ठिकाणांहून अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. तर याच पार्श्वभूमीवर अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे.