जिबौती देश स्वतंत्र
जिबौती, दि. 27 – आफ्रिका खंडातील फ्रान्सची शेवटची वसाहत “जिबौती’ हे राष्ट्र काल मध्यरात्री स्वतंत्र झाले. तांबड्या समुद्राच्या मुखाशी असलेल्या या राष्ट्राच्या स्वातंत्र्यप्रसंगी येथे ध्वजारोहण होऊन 21 तोफांची सलामी देण्यात आली. आफ्रिका खंडातील हे 49वे स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याचे क्षेत्रफळ 23 हजार चौ.कि.मी. असून इथिओपिया व सोमालिया ही दोन्ही शेजारी राष्ट्रे त्यातील प्रदेशावर आपला हक्क सांगतात. हसन गौलेद हे या नवस्वतंत्र राष्ट्राचे अध्यक्ष आहेत.
अमेरिका इस्रायलला संरक्षण सामग्री विकणार
वॉशिंग्टन – इस्रायलला एकूण 11.5 कोटी डॉलर्सची 200 रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे व 15 बुलडोझर रणगाडे, 200 चिलखती गाड्या, इतर संरक्षणसामग्री विकण्याचा निर्णय अध्यक्ष कार्टर यांनी घेतला आहे.
खऱ्या मैत्रीचे चिन्ह
जेरुसलेममध्ये या वार्तेचे स्वागत करून इस्रायलचे पंतप्रधान वेगिन म्हणाले, अमेरिका व इस्रायल यांच्यातील खऱ्या मैत्रीचे हे चिन्ह असेल अशी आम्हास आशा आहे.