जुन्नर (पुणे) – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील 24 तासांत करोना बाधित 47 रुग्ण आढळून आले. हॉटस्पॉट असलेल्या नारायणगाव आणि ओतूर या दोन्ही मोठ्या गावांमध्ये प्रत्येकी 9 रुग्ण आळले आहेत. बेल्हे 4, येणेर, आर्वी पिंपळगाव प्रत्येकी 3, डिंगोरे आणि जुन्नर प्रत्येकी दोन तर पिंपरी पेंढार, बोरी, वडगाव आनंद, आळे, पिंपळवंडी, डुंबरवाडी, निरगुडे, सावरगाव, मांदारणे, खिलारवाडी, वडगाव कांदळी, गुळुंचवाडी, बारव या गावांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील करोना रुग्णांचा आकडा 1283वर पोहोचला आहे.