ता. 16, माहे नोव्हेंबर, सन 1976
लाहोर – भारत व चीनमधील संबंध सुधारल्यास ते पाकिस्तानला फायदेशीर होईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान झेड. ए. भुट्टो म्हणाले. रेडिओ पाकिस्तानवरून प्रसारित करण्यात आलेल्या भुट्टोंच्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत-चीन संबंधामुळे पाकिस्तानात कोणताही संशय निर्माण झालेला नाही.
संरक्षण उत्पादनात शिथिलता नको
पुणे – संरक्षण उत्पादनातील शिथिलता सहन केली जाणार नाही, असा इशारा संरक्षण उत्पादन राज्यमंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांनी दिला. इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षा संरक्षण कामगार वेगळे आहेत.
दुर्बल घटकांना अधिक प्रतिनिधित्व
नवी दिल्ली – मागास व अनुसूचित जमातीच्या लोकांना केंद्र सरकारच्या सेवेत अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबतचे विविध निर्णय गेल्या आठवड्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. केंद्र सरकारच्या सेवेतील सर्व वर्गात या दुर्बल घटकांना त्याचा योग्य वाटा मिळतो किंवा नाही याची पहाणी करण्यासाठी तसेच या सेवेत प्रवेश करताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी ही समिती ठराविक काळाने कामकाजास असते. तिसऱ्या व चौथ्या वर्गाच्या सेवेत या लोकांना मिळणाऱ्या संधीत वाढ झाली आहे.