43 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

नगर: अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या 4 डंपर आणि एका टेम्पोवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून त्यांच्याकडून 43 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक व टेम्पोचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
डंपरचालक योगश बिरा माळी (वय. 26,), ज्ञानेश्वर शिवराम हातेकर (वय 24, दोघे रा. नांदगाव, ता. जि. नगर), सुभाष रामू निकम (वय. 24, रा, शिंगवे नाईक, ता. जि. नगर) अशोक भगवंत काळे (वय 58, रा. शिंगवे नाईक ता. जि.नगर) अशी डंपरचालकांची नावे आहेत. तर रवि संजय बर्डे (वय, 21, रा. देवसंडी ता. राहूरी जि. नगर) असे टेम्पोचालकाचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती नुसार नगर-मनमाड रोडवर नांदगाव येथून 3 ते 4 डंपर एकापाठोपाठ येत असून त्यातून वाळूची चोरून वाहतुक केली जात आहे. त्यानुसार त्यांनी लागलीच पथकातील कर्मचाऱ्यांना घेऊन तेथे सापळा लावला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या चार डंपरसह एकूण 16 ब्रास वाळू असा 38 लाख 609 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर पाथर्डी रोडवरून एक टेम्पो वाळू वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरही सापळा लावून पोलिसांनी टेम्पो बुन्हानपुर फाटा येथे अडवून कारवाई केली. त्यावेळी टेम्पो व त्यातील 2 ब्रास वाळू असा 5 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.