बीड – गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार महिला पाण्यात बुडाल्या आहेत. यापैकी एका महिलेला वाचविण्यात यश आले मात्र अन्य् तिघींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहऴ व्यक्त केली जात आहे.
रंजना गोडबोले वय 30, शीतल गोडबोले वय 10 आणि अर्चना गोडबोले वय 10, यांचा मृतांचे नावे आहे. आरती गोडबोले या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.
मिरगाव येथे ह्या महिला कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाण्यात बुडाल्या आहेत. या घटनेत तिघींचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन दहा वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. ही घटना समजताच गावकऱ्यांनी नदीवर वाचविण्यासाठी धाव घेतली मात्र चार पैकी एका मुलिस वाचविण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.