हवाई (अमेरिका) – अमेरिकेतील हवाई बेटावर एका प्रवासी विमानाला वावटळीचा तडाखा बसल्यामुळे विमानातील 36 प्रवासी जखमी झाले आहेत. (36 patients injured after severe turbulence on flight) हे विमान होनुलूलू येथे निघाले होते. विमानतळावर विमान उतरण्याच्या 30 मिनिटे आगोदर वावटळीचा फटका या विमानाला बसला.
सुदैवाने हे विमान होनुलूलू विमानतळावर सुखरुपपणे उतरवण्यात वैमानिकाला यश आले. मात्र वावटळीमुळे विमानातील 36 जणांना या वावटळीचा जोरदार फटका बसला. यामध्ये 14 महिन्यांच्या एका बालकाचा आणि 3 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.
काही जणांच्या डोक्याला इजा झाली आहे. तर काहींना कापले आहे, काहींना खरचटले आहे. काहींना चक्कर आली तर काही जण चक्क बेशुद्ध झाले आहेत, असे हवाईयन एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
या विमानामध्ये 278 प्रवासी आणि 10 कर्मचारी होते. अशाप्रकारची वावटळ कोणत्याही इशाऱ्याशिवाय उद्भवू शकते. मात्र तशी परिस्थिती फारच क्वचित उद्भवू शकते. मात्र यावेळी निर्माण झालेली ही वादळसदृश्य स्थिती पारच गंभीर होती, असे हवाईयन एअर कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन स्नूक यांनी पत्रकारांना सांगितले.