जयपूर – राजस्थानातील नागरिकांना येत्या 1 एप्रिलपासून केवळ पाचशे रूपयांत घरगुती गॅस सिलिंडर दिला जाणार असल्याची घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान अलवर येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
गेहलोत म्हणाले की, पुढच्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यात दारिद्रयरेषेखालील अर्थात बीपीएलच्या लोकांना स्वयंपाकाचा गॅस जो आता 1040 रूपयांत दिला जातो तो एप्रिलपासून 500 रूपयांत दिला जाईल अशी तरतूद केली जाणार आहे. वर्षाला 12 सिलिंडर दिले जातील.
The issue of price rise is serious. We will give 12 gas cylinders in a year at Rs 500 each to BPL families after April 1 next year. No one should remain deprived of benefits of government welfare schemes: Rajasthan CM Ashok Gehlot at Alwar pic.twitter.com/unrGvFwJfp
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 19, 2022
महागाई जेवढी कमी करता येईल तेवढी आम्ही करू. ती कशी कमी करायची यासंदर्भात कोणाकडे काही सूचना असतील तर त्याही आम्ही मागवणार आहोत. नागरिकांसाठी तुम्हाला जे काही करता येण्यासारखे आहे ते सगळे करा अशा सूचना राहुल गांधी यांनी आम्हाला केल्या आहेत. आता मी केवळ सिलिंडरचेच सांगतो आहे. अन्य घोषणा अर्थसंकल्पात केल्या जातील.