मुंबई – अभिनेता अक्षय कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यशराज फिल्म्सने ‘पृथ्वीराज’ चे पोस्टर बनवून अक्षयच्या आतापर्यंतच्या कामाचा दाखला दिला आहे.
View this post on Instagram
या पोस्टरची खास गोष्ट म्हणजे यामध्ये अक्षयचा एकेक चित्रपट दाखवण्यात आला आहे. प्रोडक्शन हाऊसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय म्हणाला, “माझ्या मनात हेही आले नाही की, चित्रपटसृष्टीतील माझी तीस वर्षे साजरी करण्यासाठी ही तयारी केली जात होती! माझ्या ‘सौगंध’ या पहिल्या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली हे आश्चर्यकारक आहे!
View this post on Instagram
अक्षय म्हणाला, “माझ्या फिल्मी करिअरचा पहिला सीन उटीमध्ये होता आणि तो एक अॅक्शन सीन होता! यासाठी खूप खूप धन्यवाद. हे खरंच खास आहे.” अक्षयचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ हा निडर आणि पराक्रमी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवन आणि शौर्याच्या कथेवर आधारित आहे. आक्रमणकर्त्यांविरुद्ध धैर्याने लढणाऱ्या महान योद्ध्याची भूमिका अक्षय साकारत आहे.