मुंबई – बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच त्यांचा ‘स्कॅम 2003– द तेलगी स्टोरी’ ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 4 ऑगस्ट रोजी या वेबसिरिजचा टीझर रिलीज झाला आहे. यातून या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.
या सीरिजची संपूर्ण कथा अब्दुल करीम तेलगीवर आधारित असणार आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे. स्टॅम्प पेपर छापण्यासाठी लागणारी यंत्रे, ही यंत्रे विकत घेण्यासाठी तेलगीने बँका, विमा कंपन्या, 300 हून अधिक लोकांना कामावर ठेवले आणि इतर अनेकांची कशाप्रकारे फसवणूक केली. या सगळ्यात जवळपास 30 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. यावर आधारित सीरिजचे कथानक असणार आहे.
View this post on Instagram
‘स्कॅम 2003’ चा टीझर शेअर करत निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली. ही सिरिज 2 सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल. कामाच्या आघाडीवर, हंसल मेहता शेवटचे नेटफ्लिक्स क्राईम ड्रामा मालिका ‘स्कूप’ सह-निर्मिती आणि दिग्दर्शन करताना दिसले होते. यापूर्वी त्यांनी ‘फराज’ हा थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘स्कॅम 1992’ नंतर आता ‘स्कॅम 2003’ पाहण्यास देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.