आपण सकाळी लवकर उठून ३० मिनिटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. कारण आपण दीर्घायुष्यी आहात व आपले आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.
- एकही पैसा खर्च न करता करता होणारा व्यायाम प्रकार
- सर्वाना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
- कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
- शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
-
सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो
-
हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळ्च्या कोवळ्या उनातून मिळते
- चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो
- सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो
- चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते
-
चालण्यामुळे झोपही चांगली लागते
-
मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते
- वजन कमी करण्यास मदत होते
- चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात
- चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते
-
दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे
-
चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात
- झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो
- नियमित चालण्याची सवय असणा-यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी असते
- नियमित चालणा-यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते
-
नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते
-
नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते
- हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते
- नियमित चालण्यामुळे कंबर, मांडया, पायाचे स्नायू मजबूत होतात
- मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
-
नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो
-
नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग
- चालण्यातून नराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
- दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य तीन वर्षानी वाढते
- नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
- चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही आपल्याला नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच करावा.