१५ वर्षीय शेफालीने सचिनसह तीन फलंदाजांचा विक्रम काढला मोडीत

पुणे : भारतीय महिलासंघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बाजी मारल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवातही दमदार केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ८४ धावांनी विजय मिळवत मातीत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात १५ वर्षीय शेफाली वर्मानं 49 चेंडूंत 73 धावा सचिन तेंडुलकरसह महान तीन फलंदाजांच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढून स्वतःच्या नावावर केला आहे.

वेस्टइंडीजविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी 4 बाद 185 धावा केल्या. यामध्ये शेफाली आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची पारी खेळली.

शेफालीनं ७३ धाव केल्या असून त्यामध्ये 6 चौकार व 4 षटकार लगावले आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील शेफालीच हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. स्मृतीनं 46 चेंडूंत 11 चौकारांसह 67 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर ( 21) आणि वेदा कृष्णमुर्ती ( 15*) यांनी छोटेखानी महत्त्वाच्या खेळी केल्या.

भारतीय संघाने उभा केलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 बाद 101 धावा करता आल्या. शेमैन कॅम्प्बेल ( 33) वगळता विंडीजच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखले. शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पण, या सामन्यात शेफालीनं तेंडुलकरचा विक्रम मोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.