श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर शहरातील झुनिमार भागामध्ये आज झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. या भागात लपून राहिलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाअठी सुरक्षा रक्षकांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर चक्मकीला सुरुवात झाली.
हे दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, असे काश्मीर विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.
ठार झालेल्यांपैकी एक दहशतवादी पांडा चौकात बीएसएफच्या ताफ्यावरील हल्ल्यातही सहभागी झालेला होता. या हल्ल्यामध्ये बीएसएफचे 2 जवान शहीद झाले होते.
आज ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या जवळून एके-47 रायफल, अमेरिकन बनावटीची एम4 रायफल ताब्यात घेण्यात आली आहे. कालच कथुआ जिल्ह्यामध्ये बीएसएफच्या जवानांनी पाडलेल्या ड्रोनध्ये बसवलेली अशीच रायफल ताब्यात घेण्यात आलेली होती.
या भागात दहशतवद्यांच्या उपस्थितीनंतर अफवा अणि चिथावणीखोर मेसेज प्रसारीत होऊ नयेत, म्हणून प्रशासनाने मोबाइल इंटरनेट सेवा खंडित केली आहे. श्रीनगर शहराच्या बहुतेक भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक आणि हालचालींवर निबंध घालण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.