भीषण अपघात, अज्ञात वाहनाची जोरदार धडक, तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू

ऊना – हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील गैगरेट येथे आशापुरी बॅरीयर जवळ भीषण अपघातात तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री उशीरा घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तीन जवान चौथ्या IRBN बटालियनचे होते. हिट अँड रनची ही केस आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली हे अद्याप कळू शकले नाही.

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली, या दुचाकीवर बसलेल्या पोलिसांचा मृत्यू झाला असून वाहनाने धडक दिल्याचा आवाज ऐकूण बाकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला संपर्क केला.

रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होताच डॉक्टरांना दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. हे सर्व पोलिस कर्मचारी हमीरपुर जिल्ह्यातील रहिवासी होते. पोलिस अद्यात वाहनाचा शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.