वसई : सद्या सोशलवर युजर्स आपल्या आवडीच्या विषयावर नेहमीच माहिती देत असतात. सोशलवरील अँप्सवर प्रत्येक जन त्याचा अनुभव सल्ले एखाद्या सुद्धा देत असतात. यात डॉक्टरही आजारांबाबत माहिती देत असतात. मात्र सोशलवर अनेकदा डॉक्टरांकडून चुकीचा सल्ला दिल्या मुळे युजर्स चांगलीच फसवणूक होतांना दिसते.
अशीच फसवणूक वसईतील यूट्यूब डॉक्टरने केल्याचा प्रकारपुढे आला आहे. मानसिक आजार दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घातला आहे. या यूट्यूब डॉक्टरचे नाव डॉ. कैलास मंत्री असून त्यांनी डॉक्टरकीची अभ्यास अमेरिकेत केला होता. त्यांनी हि माहिती त्यांच्या युट्युब चँनलवर दिली असून दहा दिवसांत मानसिक आजार दूर करण्याचा दावा त्यांनी चॅनेलवरून केला होता.
तर दुसरीकडे हैद्राबाद येथे राहणाऱ्या किरणकुमार वांगला यांच्या मुलीला मानसिक आजार असल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचा मुलीला दाखविले होते मात्र कुठल्याच डॉक्टरचा उपचारामुळे प्रकृती बरी होत नसल्याने त्यांनी यूट्यूब डॉक्टर कैलास मंत्री यांना संवाद साधला त्यावेळी मंत्री यांनी मानसिक आजार दूर करण्यासाठी मुलीला शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. तसेच मद्यपान करावं लागेल, असे अजब सल्ले दिले.
यानंतर त्यांचा भांडाफोड झाला आहे. वांगला यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच या डॉक्टरने आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.