चीनच्या काळकोठडीत 30 लाख उघ्यूर नागरिक

उघ्यूर अमेरिकन कार्यकर्तीच्या मुलाखतीत मुस्लिमांवर चीनकडून होणारे अन्यायांना वाचा

वॉशिंग्टन – शिनजिआंग प्रांतात 2017 मध्ये परिस्थिती बिघडू लागली. त्यावेळी चीनी सरकारने 10 लाख लोकांना छळछावण्यात (ताबा छावण्या) ठेवले होते. सध्या ती संख्या 30 लाखांवर गेली आहे, असे उघ्यूर अमेरिकन कार्यकर्तीने एका मुलाखतीत स्पष्ट केले.

उघ्यूर प्रातांतील लोकांच्या हक्कासाठी बोलायला लागल्यानंतर आणि त्यांच्या स्थानिक अल्पसंख्यांकाच्या हक्काबाबत जनजागृती करायला सुरवात केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे कसे अपहरण करण्यात आले याची माहितीही त्यांनी यु ट्यूवर अपलोड केलेल्या मुलाखतीत दिली.

मला ज्यावेळी तेथील अभूतपूर्व स्थिती समजली. उघ्यूर नागरिकांवर होणारे अत्याचार लक्षात आले. हे काही माध्यमांच्या मुख्य प्रवाहात उमटतच नव्हतं. त्यावेळी मी उघ्यूर नागरिकांसाठी मोहीम राबवण्यास सुरवात केली. कारण मी एक कार्यकर्ती आहे.

केवळ आणि केवळ म्हणूनच माझ्या मातृभूमीत होणाऱ्या अन्याया विरोधात मी आवाज उठवण्यास सुरवात केली. त्यावेळी माझी बहीण आणि आत्याचे अपहरण करण्यात आले, असे रूसान अब्बास यांनी यु ट्यूबवर अलीकडे अपलोड केलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

वॉशिंग्टन येथील बुध्दीवाद्यांच्या परिषदेत मी भाषण दिल्यानंतर सहाच दिवसांत माझ्या बहिणीचे आणि आत्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर मी माझी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ती बनली आहे. मी उघ्यूर मोहिमेची ऑक्‍टोबर 2019पासून कार्यकारी संचालक आहे. उघ्यूर लोकांच्या होणाऱ्या नरसंहाराविरोधात तेंव्हापासून मी आवाज उठवत आहे, असे त्या म्हणाल्या.

चीनने पाश्‍चिमात्यांसाठी 70 दशकांत आपली द्वारे खुली केली. त्यावेळी लोकांना त्यांना हवे ते करण्याची मुभा होती. 1949 मध्ये पूर्व तुर्कस्तानचा भाग चीनने बळकावल्यानंतर तो काळ तेवढा काहीसा सुखद होता. त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली. अमेरिकेत झालेल्या 9/11च्या हल्ल्यानंतर चीनी शासक मुस्लिमांविरोधात बोलू लागले. त्यांनी रात्रीत उघ्यूर नागरिकांसाठी योजना बनवली. ते आमच्यावर मुस्लिम दहशतवादी म्हणून शिक्का मारला, असे त्या म्हणाल्या.

या महिन्यात उघ्यूर नागरिकांच्या नरसंहाराच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या भूमीकेला 45 देशांनी पाठिंबा दिला. ती राष्ट्रे चीनची मित्र राष्ट्रे असतील. मी हतबल होते. मात्र नंतर लक्षात आले त्या सर्व राष्ट्रातही हुकुमशाहीच आहे किंवा तशी स्थिती ते कोणत्याही क्षणी आणू शकतात. या तथाकथित चिनमित्रांच्या राष्ट्रात राजव्यवस्था हीन स्वरूपाचीच आहे, असे अब्बास यांनी सांगितले.

शिनजिआंग प्रांतात सुमारे एक कोटी उघ्यूर नागरिक राहतात. त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 45 टक्के आहे. सांस्कृतिक, धार्मिक अणि आर्थिक सतरावर चीन प्रशासन आक्रमण करत असल्याचा या नागरिकांचा जूना आरोप आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.