पुणे – सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला मानवंदना देण्यासाठी देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण करण्यात आले. एकाच वेळी 522 व्यक्तींनी उपक्रमात सहभाग घेत सलग 25 तासांपेक्षा अधिक वेळ देशभक्तीपर गायन करण्याची ही पहिलीच वेळ होती. सर्वांधिक व्यक्तींचा सहभाग आणि सलग गायन असे दोन विक्रम “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ कडून नोंदविण्यात आले.
दोन दिवस निरीक्षण करण्यासाठी आलेल्या गोल्डन बुक ऑफ रेकोर्डसचे प्रतिनिधी मनीष विष्णोई यांनी त्याची अधिकृत घोषणा करून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना प्रमाणपत्र प्रदान केले. उपक्रमात सहभागी प्रत्येकाला गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे विशेष प्रमाणपत्र मिळणार आहे.
संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या आगळयावेगळ्या उपक्रमाच्या सांगता सोहळ्यावेळी जैन धर्मगुरू आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्ट्रॅटेजिक फोरसाईटचे वरिष्ठ सल्लागार सचिन इटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा करताच विद्यार्थी व शिक्षकांनी जल्लोष केला.