पालकमंत्र्यांचा मतदारसंघात विकास कामांचा धडाका

बारामती पॅटर्न झटका देण्याच्या तयारीत

राम शिंदे हे मुरलेले राजकारणी असल्याने ते ऐन निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर करतात. परंतु, मागच्या विधानसभेच्या वेळी त्यांच्या बाजुला जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपत गेले होते ते नाराज होऊन परत राष्ट्रवादीत गेले. तशी भाजपत शिंदे यांचा मंत्री झाल्यापासुन बदललेला स्वभावामुळे त्यांच्या विषयी कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढलेली दिसत आहे. असे असले तरी बहुजन समाजाचा माणुस म्हणुन त्यांना सर्वसामान्य मतदार पहात आहेत. पण शिंदे यांनी सर्वसामान्यांशी संपर्क जर ठेवला नाही तर बारामती पॅटर्न त्यांना झटका दाखवण्याची जास्त शक्‍यता आहे. 

जामखेड – आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पालकमंत्री राम शिंदे कर्जत – जामखेड कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून विकास कामांचा धडका सुरु केला आहे. यातील बहुतांशी कामे मार्गी लागली असली तरी काही कामे आजही अपूर्ण असल्याने ती आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ना. शिंदे हे गेली दोन टर्म कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा गावानिहाय हिशोब दिला आहे. गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची तर यादीच जाहीर केली. एकंदरीतच या माध्यमातून भाजपने लढाईच्या अगोदरच विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही वर्ष आरक्षित राहिलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

कर्जत जामखेड हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्यात या अगोदर आघाडीची सत्ता होती. सत्ता एका पक्षाची आणि आमदार दुसऱ्या पक्षाचा यामुळे दुष्काळग्रस्त कर्जत – जामखेड हे दोन तालुके सातत्याने दुर्लक्षित राहिले.

दरम्यान 2009 ला ना. शिंदे यांना भाजपने विशेषतः दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. ना. शिंदे यांच्या रूपाने या मतदारसंघाला शेतकरी कुटुंबातील आमदार मिळाला. परंतु दोन्हीकडे पुन्हा राष्ट्रीय पुरोगामी आघाडीचे सरकार आले. असे असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी पाठपुरावा करून मतदार संघात अनेक विकास कामे केली.

गेल्यावेळी भाजपची सत्ता आली. प्रा.शिंदे यांनी मंत्रिमंडळ राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गृह, पर्यटन, पणन, आरोग्य, ओबीसी कल्याण यासारख्या विविध खात्यांचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी प्रा.शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून प्रा.शिंदे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली. दरम्यान गेल्या पावणे पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले.

दरम्यान गेल्या दहा वर्षात कोणत्या गावात किती काम केले. याचा हिशोब देण्यास स्थानिक आमदार या नात्याने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुरू केले आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे प्रयत्न प्रा. शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावानुसार केलेल्या कामांचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×