देशात तीन वर्षांत 230 राजकीय हत्या

नवी दिल्ली – देशात 2017 ते 2019 या तीन वर्षांच्या कालावधीत राजकीय कारणांवरून 230 जणांची हत्या झाली. तशा घटनांची सर्वांधिक नोंद झारखंडमध्ये झाली.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत राजकीय कारणांवरून झालेल्या हत्येच्या घटनांची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, झारखंडमध्ये सर्वांधिक 49 जणांची हत्या झाली. पश्‍चिम बंगाल आणि बिहारमध्ये ती संख्या अनुक्रमे 27 आणि 26 इतकी आहे.

राजकीय कारणांवरून कर्नाटकात 24 जणांची, तर महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी 15 जणांची हत्या झाल्याची नोंद आहे. देशात 2017 मध्ये सर्वांधिक 99 राजकीय हत्या झाल्या. पुढील दोन वर्षांत तशाप्रकारच्या अनुक्रमे 59 आणि 72 घटना नोंदल्या गेल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.