‘खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य; शिवनेरी’च्या विकासाठी 23 कोटी मंजूर’

पुणे: आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. दरम्यान, अजित पवारांनी बोलताना शिवनेरी गडाच्या विकासाठी मुख्यमंत्र्यांनी 23 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. कोणताही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निधी मंजूर केल्याचे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, शिवनेरीवर आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे व जिल्हाधिकाऱ्यांनी कामांची माहिती दिली. या कामांसाठी 23 कोटी रुपये आवश्यक असल्याचे सांगितले. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने 23 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले, चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आले आहे असं लोकांना वाटत असल्याचे पवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांशी संवाद साधला. आता जे काही आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आम्ही जे काही चांगलं करायचं आहे ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. एवढं एक वचन, एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने घेतो. गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे की हे महा विकास आघाडीचे सरकार आहे पण हे माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे ही भावना गोरगरिबांच्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.