जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा; ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर आऊट

चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत. प्रवीण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

या पोस्टला जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा… अशी कॅप्शन देण्यात आली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत प्रवीण तरडे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सरसेनापती हंबीरराव यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मोठी मदत केली आहे. आणि आता त्यांचा हाच जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचेच असून, 2020 मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.