नगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शनिवारी (दि.२०) ९ जणांना २२ अर्ज घेतले. शिर्डी मतदार संघासाठी १२ व्यक्तींनी २३ अर्ज घेतले. अहमदनगर मतदार संघासाठी तीन दिवसात १०७ अर्ज घेतले आहेत. एक ही अर्ज दाखल झालेला नाही. शिर्डीसाठी आतापर्यंत ४८ इच्छूक उमेदवारांनी ८९ अर्ज घेतले आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे.
नगरसाठी शनिवारी (दि.२०) अर्ज घेतले इच्छुक उमेदवार याप्रमाणे – मच्छिंद्र राधाकिसन गावडे (रा. मल्हारवाडी, ता. राहुरी)- ४ अर्ज, भाऊसाहेब बापूराव वाबळे (रा. दरेवाडी, ता. नगर) -दोन अर्ज, दत्तात्रय अप्पासाहेब वाघमोडे (साकत, ता. नगर)-एक, मदन कानिफनाथ सोनवणे (रा. मोरगव्हाण, नेवासे)- दोन तसेच धीरज मोतीलाल बगाडे (रा. पाथर्डी) यांच्यासाठी एक, उमाशंकर शामबाबू यादव (रा. बोल्हेगाव, ता.नगर)-दोन, हनुमंत देवीदास घावणे (रा. राक्षसवाडी, ता. कर्जत)-दोन, स्मिता बापूसाहेब तरटे (रा. श्रीगोंदे)-चार, शहाजी राजेंद्र काकडे (ढोरले, ता. जामखेड)- चार अर्ज घेतले आहे.
शिर्डी मतदारसंघासाठी तीन दिवसात ४८ इच्छूक उमेदवारांनी ८९ अर्ज नेले आहेत. अर्ज घेणाऱ्या इच्छुकांची नावे पुढील प्रमाणे – सतीश भिवा पवार, संजय हरिश्चंद्र खामकर, बाळासाहेब हिरामण भोसले, ॲड. सिध्दार्थ दीपक बोधक, चंद्रकांत संभाजी दोंदे, अभिजित अशोकराव पोटे, डॉ. जयंत दामोदर गायकवाड, चंद्रकांत सखाराम बागुल, चंद्राहार त्र्यंबक जगताप, ॲड. नितीन दादाहरी पोळ, प्रशांत वसंत निकम, किशोर दादू वाघमारे, सुधाकर प्रभाकर रोहम, राजेंद्र सखाराम घायवट, शंकर संभाजी भारस्कर, संदीप सीताराम घनदाट, अशोक अनाजी वाकचौरे, गोरक्ष तान्हाजी बागूल, राजू नामदेव कदम, रामचंद्र नामदेव जाधव, सदाशिव किसन लोखंडे, दिलीपराव भाऊसाहेब गायकवाड, उत्कर्षा प्रेमानंद रूपवते,
विशाल बबनराव कोळगे, योगेश रवींद्र जाधव, यशवंत रामा म्हस्के, योहान रोहिदास साळवे, रवींद्र नाना पारखे, संजय पोपट भालेराव, बबन लहानू गवळी, विश्वास दादासाहेब माघाडे, विजयराव गोविंदराव खाजेकर, गंगाधर राजाराम कदम, अश्विनी चंद्रकांत दोंदे, नचिकेत रघुनाथ खरात, विनोद मारूती अहिरे, नितीन नवनाथ उदमले, संतोष तुळशीराम वैराळ, रावसाहेब रामचंद्र गायकवाड, शरद केरू खरात, चंद्रकांत केरू खरात, जयाबाई राहूल डोळस, बाबासाहेब मुरलीधर आंबेडकर, डॉ. अशोक बाजीराव म्हंकाळे, प्रशांत सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे व प्रथमेश विलास गोतीस यांनी अर्ज घेतले आहेत.