मुंबई – जूनपर्यंत भारतात पुरेशा लसी उपलब्ध होतील. तसेच लसींचे हे डोस 20 कोटींपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांच्या उत्पादन वाढीसह स्पुटनिकही आयात केली जाणार असून आता अमेरिकेतील फायझर या कंपनीशीही बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारने राज्य तसेच खाजगी रुग्णालयांना लस निर्मात्यांशी किमतींबाबत बातचित चर्चा करण्यास सांगितले आहे. बदल्यात उत्पादकांनी सरकारकडे मागणी केली की त्यांना जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धी बनवण्यासाठी लसीची किंमत ठरवली जावी.
भारत बायोटेकने मंगळवारी सांगितले की त्यांच्या करोना लसीचे उत्पादन 70 कोटींपर्यंत वाढेल. साठ देशांना लस निर्यात करण्याची त्यांची योजना आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत – 15 ते 20 डॉलर प्रति लस ठेवली आहे.
सूत्रांनी सांगितले की भारतात साधारणपणे लसीच्या डोसची किंमत 500 ते 1000 रुपये यादरम्यान असण्याची शक्यता आहे. हे अधिकाधिक खरेदी मूल्य असेल. लस निर्मात्यांना लसीची किंमत घोषित करणे गरजेचे असणार आहे.