चिंता वाढवणारी बातमी! करोनाची दुसरी लाट थोपवायला लागणार ‘इतके’ महिने

नवी दिल्ली – देशात आलेली करोनाची दुसरी लाट परतवून लावायला आता डिसेंबर महिना उजाडेल. 2021 च्या अखेरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल. त्यानंतर 2022 च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेईल, असे भाकीत भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अर्थात एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तविले आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले, करोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने करोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करणे हाच मार्ग उरला आहे.

देशात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा अनेकांना करोनाची साथ संपली असे वाटले. मात्र, करोनाच्या विषाणूने स्वत:मध्ये बदल घडवले आणि तो नव्या स्ट्रेनसह परत आला. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच करोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारीही 85.56 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहे.

देशात सध्याच्या घडीला प्रत्येक दिवशी 2,50,000 लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा असाच वाढत गेल्यास आगामी काळात भारताची परिस्थिती अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही बिकट होऊ शकते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.