बारामती – करोनाच्या पार्श्वभूमीवर जळोची (बारामती) येथे गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या 20 जणांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.
ज्ञानेश्वर बाबुराव वाकोडे, अंकुश बाबुराव वाकुडे, अक्षय हिंदूराव ढवळे, अश्विनी अशोक ढवळे, वृषाली किशोर ढवळे, वर्षा अर्जुन ढवळे, हिरकणी हिम्मत ढवळे, चांदणी अंकुश वाकुडे, मंगल बाबुराव वाकुडे, अशा मोहन गोंडे, माया दयावंत ढवळे, जया हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन हिम्मत ढवळे, किशोर हिम्मत ढवळे, चेतन अरूण साळुंखे, हिंदूराव जयराम ढवळे, हिम्मत जयराम ढवळे, साकाबाई हिम्मत ढवळे, गौरव अरूण साळुंखे (सर्व रा. जळोची) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस कर्मचारी पोपट बुधा कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे.
बारामती शहरातील जळोची येथे शुक्रवारी (दि. 27) चार वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाला मारहाण झाली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोसई गंपले, पोसई शेलार पोलीस नाईक काजळे, काळे, कोकाटे, पाटील, नाळे, होमगार्ड धायगुडे जखमी झाले आहेत.
पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून आलेल्या व करोनो विषाणू संसर्ग अनुषंगाने जळोची येथील जोशी वाडा येथील पुरुष व महिला यांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्के असलेली व्यक्ती जळोची गावात बाहेर बिनधास्त फिरत होती. त्या कारणावरून जळोची गावातील मूळ स्थानिक लोक व जोशी समाजाचे लोक यांच्यात मारामारी सुरू झाली. घटनेची खबर मिळताच पोलीस पथक पोहोचले. पोलिसांनी कारवाई करताच आरोपींनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दांडके, दगड, विटा यांनी केल्याने पोलीस जखमी झाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
समजावून सांगणे पडले महागात
बारामती -होम क्वारंटाइन असताना बाहेर फिरत असल्याने समजावुन सांगितले राग मनात धरून एकस दगड, विटा, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय हिंदुराव ढवळे, विजय हिंदुराव ढवळे, अर्जुन हिमंत ढवळे, किशोर हिंमत ढवळे, चेतन अरूण साळुंखे, हिंदुराव जयराम ढवळे, हिंमत जयराम ढवळे, गौरव अरूण साळुंखे (सर्व रा. जळोची, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तर संग्राम बापुराव माने (वय 28 रा. जळोची) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुम्ही व तुमचे नातेवाईक पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून आलेले असून तुमच्या हातावर होम क्वारंटाइन शिक्के मारलेले असताना तुम्ही काळजी घेत नाही मी नगरपालिकेकडे जावून तक्रार करतो असे माने यांनी आरोपींना सांगताच आरोपी चिडले व त्यांनी मानेंना धमकी देत बेकायदा गर्दी जमाव जमवून मानेंना मारहाण करून जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.