- 13 जणांचा मृत्यू
- 886 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरात आज 1864 नवीन रुग्णांची भर पडली. तर 13 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत आजपर्यंत शहरातील 1 लाख 30 हजार 572 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 1825 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 39 रुग्णाची नोंद झाली. तसेच दिवसभरात 13 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 7 तर शहराबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील निगडी, पिंपरी, चिखली, चिंचवड, चऱ्होली येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका 37 वर्षीय महिलेसह 30 वर्षाच्या तरुणाचाही समावेश आहे. तर शहराबाहेरील सोलापूर, लोहगाव, पुणे, तळेगाव, जुन्नर व खेड येथील 6 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 2784 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1957 व शहराबाहेरील 827 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 886 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 648 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5676 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1085 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 2262 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 12,706 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 14,968 इतकी आहे.
ड प्रभागात सर्वाधिक रुग्ण
शहरातील ड प्रभागामध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरचा परिसर येतो. या भागामध्ये शहरातील सर्वाधिक 301 रुग्ण आहेत. तर अ प्रभागात 267, ब 297, क 162, इ 159, फ 252, ग 264 व ह प्रभागामध्ये 123 नवीन रुग्णांची आज भर पडली आहे. तसेच दिवसभरात 4684 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत 1 लाख 16 हजार 141 जणांना कोविडची लस देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि.26) दिवसभरात दहा करोनाबाधित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तर चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.याशिवाय दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पाषाण येथील एका 54 वर्षीय पुरुषाचा तर पिंपळे निलख येथील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला. याशिवाय रुग्णालयातील 30 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.