जामखेड – ज्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज आहे अशा रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जामखेड पोलीसांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. महाराष्ट्र दिनी जामखेडमध्ये आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 151 युवकांनी रक्तदान केले जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत, निरपेक्ष भावनेने 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून अपर्णा रक्तकेंद्र व जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी अजय साळवे, मधुकर राळेभात, अरूण जाधव, शामीर सय्यद, विकी सदाफुले, विनायक राऊत, बापुसाहेब गायकवाड अनिल बाबर आदिसह तालुक्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रक्तदानासारखे पवित्र कार्य कोणतेही नाही. कारण रक्तदानामुळे मृत्युच्या दारात असलेल्या व्यक्तीला जीवनदान देता येते. योग्य वेळेत योग्य व्यक्तीला योग्य ते रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. आणि हाच तुटवडा लक्षात घेऊन एखाद्या गोर गरीब व्यक्तीला जीवनदान देण्याचे कार्य रक्तदान शिबिरा सारख्या कार्यक्रमातून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून होत आहे.
यावेळी संपूर्ण तालुक्यातून रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह 25 पोलीस बांधवासह ,151 नागरिकांनी रक्तदान केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती पोलीस नाईक अविनाश ढेरे पोलीस काॅन्स्टेबल संदिप आजबे, न्यु अपर्ण व्हाॅलंटरी रक्तकेंद्राचे भाग्यश्री पवार, सुधीर माले, सुप्रिया कांबळे, जनकल्याण रक्तपेढीचे शरद बळे यांनी खास परीश्रम घेतला.