अनेक बॉलीवूड अभिनेते एखाद्-दुसरा सिनेमा केला की लगेच जाहिरात मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, “बाहुबली’ फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने गेल्या एका वर्षात तब्बल 150 कोटी रुपयांच्या ब्रॅंड ऍन्डॉर्समेंटला म्हणजेच जाहिरातींना नकार दिला आहे.
प्रभासला जनमानसातील आपले स्थान योग्य मार्गाने निर्माण करायचे असल्याने त्याने आतापर्यंत इतके ब्रॅंड नाकारले आहेत. प्रभास ब्रॅंड ऍन्डॉर्समेंटसाठी सुमारे 18 कोटी रुपये आकारतो. यापूर्वी प्रभासने अनेक ब्रॅंड्सला सपोर्ट केला आहे आणि पुढेही करत राहील.
परंतु कोणत्या ब्रॅंड्सशी जोडले जायचे याबाबत तो फार सिलेक्टिव्ह आहे. एखाद्या ब्रॅंडशी स्वतःला जोडण्याविषयी प्रभासची काही कठोर धोरणे आहेत. प्रभास त्याला पसंत असलेल्याच एंडोर्समेंटशी जुडतो.
प्रभास राधे श्याम, आदिपुरुष या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. राधे श्याम या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे आहे. प्रभास आदिपुरुषमध्ये भगवान श्रीरामच्या भूमिकेत तर
अभिनेत्री कृती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत, त्याचबरोबर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने दीपिका पादुकोणसोबत एक चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाचे नाव अजून निश्चित झाले नाही.