बीड – शहरातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या नववीच्या मुलीचा वर्गात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. रेश्मा शेख (वय 15) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा ही नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. सकाळची प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात जाऊन बसली. त्यावेळी अचानक तीला भोवळ येऊन बेशुद्ध झाली. शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अभ्यासाच्या ताण-तणावातून तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अवघ्या 15 वर्षाची विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, चिंताही वाढली आहे. 15 वर्षाच्या रेशमाचा असा अकस्मात मृत्यू झाल्यान बीडमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.