जुन्नर -जुन्नर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी रात्री उशीरा एकाच दिवशी 9, तर बुधवारी 5 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 72 झाली आहे.
पिंपळवंडी येथील एक महिला डॉक्टर, तिच्या कुटुंबातील दोन सदस्य, उंब्रज नंबर 1 येथे एक, उंब्रज नंबर 2 येथे तीन, नेतवड येथे एक, आर्वी पिंपळगाव 1, बल्लाळवाडी येथे 2, पिंपळगाव जोगा येथे 1, खानगाव व नारायणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले. या रुग्णांचा संपर्कात आलेल्या 90 जणांचे तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
ओतूर येथील पोलीस अधिकारी करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली असताना या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 23 पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुस्कारा सोडला आहे. एकूण 72 रुग्णांपैकी 32 रुग्ण बरे झाले आहेत. तर 38 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांवर लेण्याद्री येथील कोविड रुग्णालयात.
तसेच पुणे, पिंपरी येथे उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाच्या वतीने येथे कंटेन्मेंट क्षेत्रात काळजी घेऊनही रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.