सातारा, (प्रतिनिधी) – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राज्याच्या नगरविकास विभागाकडून सातारा पालिकेसाठी 13 कोटी, तर मेढा नगरपंचायतीसाठी तीन कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून सातारा शहरातील 44 आणि मेढ्यातील पाच विकासकामे मार्गी लागणार आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार, सातारा शहरातील कब्रस्तानाची संरक्षक भिंत (25 लाख), मंगळवार पेठेतील खारी विहीर येथे दोन मजली समाजमंदिर (80 लाख), यादोगोपाळ पेठेत सभामंडप, सरस्वती कॉलनीत बंदिस्त गटार (प्रत्येकी 15 लाख),
जिल्हा परिषद कॉलनीत आरसीसी बंदिस्त गटार (14 लाख), शाहूपुरीतील गणराया हौसिंग सोसायटीत वाचनालय (50 लाख), रांगोळे कॉलनीत पोहण्याचा तलाव (सव्वा कोटी), गणराया कॉलनीत बंदिस्त गटार व लक्ष्मीनगरात रस्ता डांबरीकरण, केसरकर पेठेत घोरपडे घर ते इन्फिनिटी अपार्टमेंट रस्ता (प्रत्येकी दहा लाख),
गोळीबार मैदान येथील नंदादीप सारंग येथे रस्ते व गटार (30 लाख), गडकर आळीतील सह्याद्री पार्कमध्ये रस्ता व गटार (40 लाख), देशमुख कॉलनी व मुथा कॉलनीतील रस्ते (पावणेदोन कोटी), बापूजी साळुंखेनगर व गणेश नगरात रस्ते आणि गटार, अजीज कलाल घर ते शंकर कवाडे घर ओढा संरक्षक भिंत, जिल्हा बँक ते प्रवीण जाधव घर रस्ते व गटार (प्रत्येकी 20 लाख), कोयना सहजीवन सोसायटीत रस्ते व गटार (25 लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.
कृष्णकुंज अपार्टमेंट येथे मोकळ्या जागेचा विकास, सोमवार पेठेत सभागृहाचे उर्वरित काम, केसरकर पेठेत कुंभारवाडा रस्ता काँक्रिटीकरण, करंजे कमान-भैरवनाथ मंदिर-करंजे पार रस्ता, शनिवार पेठेत सप्तशृंगी मंदिर ते ओढा काँक्रिटीकरण (प्रत्येकी 25 लाख),
फॉरेस्ट कॉलनी गिरिचिंतन तलाठी कॉलनीत मोकळ्या जागेत काँक्रिटीकरण (45 लाख), सह्याद्री पार्क, लक्ष्मीनगर येथे आरसीसी बंदिस्त गटार (17 लाख), शाहूपुरीत खटावकर कॉलनीत सभामंडप, भास्कर मेहेंदळे घर, आझाद कॉलनी ते करंजे पार रस्ता, करंजे पेठेत मंगलमूर्ती गणेश सेवा मंडळ समाजमंदिर,
कूपर कॉलनीतील नाना नानी पार्क कम्पाउंड, गेट व इतर सुविधा, शाहूपुरी मुख्य रस्ता ते प्रतीक डुप्लेक्स रस्ता काँक्रिटीकरण, करंजे पेठेत स्वागत कमानीशेजारी पालिकेच्या जागेचा विकसित (प्रत्येकी 20 लाख), सर्वोदय कॉलनी रस्ता व गटार (35 लाख), खेडमधील जयमल्हार कॉलनीतील रस्ते, गुलमोहर कॉलनीतील रस्ते, पीरवाडीतील मिस्त्री कॉलनीत रस्ते, कामाठीपुरा येथे बंदिस्त गटार, प्रभाग 18 मधील हद्दवाढ झालेल्या सोसायटीत बंदिस्त गटार, मंगळवार पेठेतील संत कबीर सोसायटीत पायर्या व गटार,
सूर्यवंशी कॉलनी ते सागरकन्या कमान ते शिवशंभो महादेव मंदिर रस्ता, निसर्ग कॉलनीत पुलाची संरक्षक भिंत (प्रत्येकी दहा लाख), पॉवर हाऊस पाण्याची टाकी ते मंगळवार पेठेतील संजय किसन चौगुले घर रस्ता (30 लाख), धस कॉलनीतील रस्ते, मंगळवार पेठेत बास्केटबॉल कोर्ट विद्युतीकरण (प्रत्येकी 15 लाख), पै चौक ते देवी चौक रस्ता व गटार (एक कोटी दहा लाख), भूविकास बँक अमृत कॉलनीत रस्ता डांबरीकरण व पाण्याची पाइप (34 लाख) असा निधी मंजूर झाला आहे.
मेढा येथे बीएसएनएल कार्यालयालगत नगरपंचायत मालकीच्या जागेत बागबगीचा (दोन कोटी), पठाण ओढा ते ग्रामीण रुग्णालय साकव पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण (20 लाख), शशिकांत गुरव घराच्या मागे गोरे यांच्या शेताकडे नदीकडील बाजूस बंदिस्त गटार व संरक्षक भिंत (30 लाख), गांधीनगरात गटार व रस्ते (30 लाख), वेण्णा हायस्कूललगत संरक्षक भिंत (90 लाख) असा निधी मंजूर झाला आहे.