कोथरूड : शहराचा विकास करताना जगभरात नव्याने समोर आलेल्या संकल्पनाही आपल्या शहरात याव्यात, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मोनोरेल प्रकल्पाने कोथरूडच्या वैभवात भर पडणार तर आहेच, शिवाय पुणे शहरासाठीही हा अभिनव प्रकल्प ठरणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले. महापौरा मोहोळ यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे शहरात आणखी एका अनोख्या पर्यटन स्थळाची भर पडणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
महापौर म्हणाले की,लहान मुलांसाठी विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करणार असून प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ही पुण्यातील पहिलीच मोनोरेल ठरणार आहे. मोनोरेल प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कोलकात्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे 5 कोटी 47 लाखांचा खर्च असणार आहे.