भोर -भोर-वेल्हे तालुक्यातील 350 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या 1200 किट्सचे वाटप भोर तालुक्यातील रचना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कोंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
तालुक्यातील वागजवाडीचे सिद्धेश्वर नगर, जाधव नगर, कासुर्डी, म्हसवली. वेल्हे तालुक्यातील कोदापूर, आडवली, साखर, दापोडे, येथील निराधार गरजूंना मदतीचा हात दिला आहे. याबरोबरच पानशेत (ता. वेल्हा) परिसरातील 35 आदिवासी कातकरी समाजातील लोकांना जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याकामी सोनल जाधव, कल्पना आवाळे, गणेश मालुसरे, मनिषा करंजकर, प्रिया इंगुळकर, उज्ज्वला डांगे, राजश्री धरपाळे, बापू गोरड, स्वाती चव्हाण, कल्पना घुले यांनी सहकार्य केले.