धक्कादायक: डॉक्टरने पुरुषांची करायला लावली “प्रेग्नेंसी टेस्ट”

झारखंड: आत्तापर्यंत महिलांऐवजी पुरुष प्रेग्नेंट राहिलेलं फक्त “नऊ महिने नऊ दिवस” या मराठी चित्रपटात पाहायला मिळाल होत. पण आता झारखंडच्या एका डॉक्टरने असा काही प्रताप केलाय कि त्यामुळे त्यांच्या डॉक्टरकीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे.

साधारणपणे जर पोटदुखीची समस्याजाणवत असेल तर डॉक्टर Ultrasound, Urine Test, Stool Test करायला सांगतात. पण झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील एका डॉक्टरने मात्र पोटदुखीची तक्रार करणाऱ्या पुरूषांना डाइरेक्ट “गर्भधारण चाचणीच” करण्यास सांगितले आहे. ज्या चिट्टीवर या चाचण्या लिहून दिल्या आहेत ती चिठ्ठी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हि चिठ्ठी पाहिल्यानंतर मात्र लोकांना हसू आवरणं कठीण झाल आहे.

गोपाल गंझू आणि कामेश्वर या दोन तरुणांना पोटाचा त्रास होत असल्याने हे दोघे सरकारी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर डॉक्टर मुकेश कुमार यांच्या सांगण्यानुसार एका खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी गेले. तेथील व्यक्तीने चिठ्ठी पाहिल्यावर या टेस्ट करण्यास नकार दिला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आल आहे.

दरम्यान हि चिठ्ठी व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर मुकेश कुमार यांचं म्हणणं आहे की, हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र असून, मी लिहिलेल्या चिठ्ठीवर ओव्हर रायटिंग करण्यात आलं आहे. परंतु चिठ्ठीवर मात्र अशी काही छेड छाड केल्याचं दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.