जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनेच्या दहशतवादी कारवाया वाढल्या

नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि बिहारमध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया वाढल्या आहेत. संघटनेसाठी काम करणाऱ्या 125 दहशतवाद्यांची नावे संबंधित यंत्रणांना दिली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली.

जेएमबीच्या देशभरातील कारवाया पाहता या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. 2014मध्ये बर्धवान येथे झालेल्या स्फोटानंतर जेएमबी प्रकाशझोतात आली. या प्रकरणाच्या तपसात रोहिंग्यांना देशात स्थीरावण्याच्या कामात या संघटनेचा कार्यरतपणा पुढे आला. जेएमबीच्या बालाकोट येथील अड्ड्यावर 40 अतीप्रतिक्षीत अतिरेकी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.

जेएमबी दक्षिण भारतातही कार्यरत असून त्यांचे दहशतवादी बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. एनआयएने अटक केलेले हबीबूर रेहमान आणि जहीदूल इस्लाम हे दोघेही कर्नाटकातील रहिवासी आहेत. त्यांनी तपसात बांगलादेश, बंगळूरू. केरळ आणि चेन्नईला प्रवास केल्याचे सांगितले आहे. हा प्रवास त्यांनी जेएमबीचे नेटवर्क उभारणसाठी केला आहे.

जेएमबीचा आणखी एक दहशतवादी एजाझ अहमद उर्फ यौफिक राजा हा व्यवसायाने केमिकल इंजिनिअर आहे. तो या संघटनेशी 2008पासून संबंधित आहे. त्याने प. बंगालमध्ये आपले विणण्यास सुरवात केली. बिरभूम, बर्धवान, मुशीदाबाद आणि नोएडा तेथे तळ निर्माण केले आहेत. मुख्यत: स्थलांतरीतांना हाताशी धरून दहशतवादी कृत्ये घडवून आणण्याचा जेएमबीचा प्रयत्न असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.