वेल्हे -पानशेत खोऱ्यात मोलमजुरी करण्याठी आलेले 115 मजूर बुधवारी (दि.13) मध्यप्रदेशला रवाना झाले. वेल्हे महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभागानी त्यांना एसटी महामंडळाच्या गाड्यांनी पोलीस बंदोबस्तात मध्यप्रदेशला रवाना करण्यात आले.
पानशेत खाऱ्यात विटभट्टी, बीएसएफ या ठिकाणी हे मजूर काम करत होते. परंतू लॉकडाऊनमध्ये कामधंदे बंद असल्यामुळे या कामगारांची आरोग्य तपासणी करून एसटी बसने रवाना करण्यात आले.
रवाना करतेवेळी या कामगारांना चहा, नाश्ता देऊन तसेच एकवेळचे अन्न त्यातील प्रत्येक मजूराला देण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी विकास पाटील, तलाठी महेश माने, रविकिरण पाटील, परमेश्वर जाधव, सुशिला मोरे आदी उपस्थित होते.