टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावले. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा हिटमॅन रोहित शर्मा हा भारतासाठी पहिला फलंदाजही ठरला आहे. रोहितने कपिल देव यांचा 40 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत रोहित पहिल्या पाचमध्येही नाही. 50 षटकांच्या विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारे टॉप 10 फलंदाज कोण आहेत…? हे आपण जाणून घेऊया या….
1. एडम मार्करम
श्रीलंकेविरुद्धच्या या विश्वचषकात एडम मार्करम याने सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. मार्करामने 49 चेंडूत शतक झळकावून केविन ओब्रायनचा 12 वर्ष जुना विक्रम मोडला.
2. केविन ओ ब्रयान
वनडे विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत आयर्लंडचा फलंदाज केविन ओ ब्रायन दुसऱ्या स्थानावर आहे. केविनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत शतक झळकावले होते.
3. ग्लेन मॅक्सवेल
ग्लेन मॅक्सवेल एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅक्सवेलने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत शतक झळकावले होते.
4. एबी डिविलियर्स
50 षटकांच्या विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत एबी डिविलियर्स चौथ्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 52 चेंडूत शतक झळकावले होते.
5. इयोन मोर्गन
एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत इयोन मोर्गन पाचव्या स्थानावर आहे. मॉर्गनने 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 57 चेंडूत शतक झळकावले होते.
6. रोहित शर्मा
रोहित शर्माने ICC विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकातील सहावे जलद शतक झळकावले. हिटमॅनने 63 चेंडूत शतक झळकावले आणि या विशेष यादीत आपले नाव नोंदवले.
7. कुशल मेंडिस
ICC विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना कुशल मेंडिसने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सातवे जलद शतक झळकावले. मेंडिसने स्फोटक शैलीत फलंदाजी करत 65 चेंडूत शतक झळकावले.
8. मॅथ्यू हेडन
मॅथ्यू हेडन आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर आहे. हेडनने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 66 चेंडूत शतक झळकावले होते.
9. जिम डेव्हिसन
कॅनडाचा फलंदाज जिम डेव्हिसन याच्या नावावर एकदिवसीय विश्वचषकातील 9वे जलद शतक आहे. डेव्हिसनने 2003 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 67 चेंडूत शतक झळकावले होते.
10. कुमार संगाकारा
वनडे विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत कुमार संगकारा 10 व्या क्रमांकावर आहे. संगकाराने 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 70 चेंडूत शतक झळकावले होते.