वाई – रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा साेहळा वाई शहर व परिसरामध्ये उत्साहात व आनंददायी वातावरणार पार पडला. संपूर्ण वाई शहर राेषणाईने उजळून गेले होते. रामभक्तांकडुन अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता परतीच्यावतीने शहरातील १३ कारसेवकांना सन्मानचिन्ह देऊन गाैरविण्यात आले.
अयाेध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा झाली. त्याचा आनंद व्यक्त करत वाई व परिसरातील रामभक्तांनी माेठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. वाई शहरातील प्रत्येक रस्त्यावर रांगाेळ्या काढण्यात आल्या हाेत्या. भगव्या झेंड्यांनी शहर केसरीमय झाले हाेते. सकाळी सगळ्या मंदिरांमध्ये राम नाम जप, रामरक्षा पठण करण्यात तरुणांनी माेठा सहभाग घेतला हाेता. सर्व मंदिरांमध्ये आकर्षक राेषणाई करण्यात आली हाेती. दारा दारात गुड्या व भगवे ध्वज उभारण्यात आल्या हाेते. संपूर्ण परिसरामध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या हाेत्या. अयाेध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सर्व मंदिरामध्ये महाआरती करण्यात आल्या. वाई शहरामध्ये सगळ्याच समाजाच्या व अनेक संस्थानी प्रसाद वाटप केले.
सायंकाळी किसन वीर चाैकामध्ये शहरातील ढाेल वादन करण्यात आले. या वादनामध्ये ५०० ढाेल वादकांनी सहभाग घेतला हाेता. रविवार पेठत भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेमध्ये घाेडे, उंट, डीजे, आकर्षक सजावट केलेला रथ सहभागी हाेते. तसेच रविवार पेठ, गंगापुरी, साेनगिरवाडी, सिध्दनाथवाडी, मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राम्हणशाही, फुलेनगर येथील मंडळांनी गल्लीतील प्रत्येक मंदिरावर आकर्षक फुलांचा देखावा व विद्युतराेषणाई करण्यात आली हाेती. तसेच चाैका चाैकात श्री राम लल्लांचे बॅनर लावण्यात आले हाेते. फटाक्यांच्या आतिषबाजीने दिवाळी साजरी झाली.